7/12 वर वारस नोंद कशी करावी? | वारस नोंद प्रक्रिया-सविस्तर माहिती

 

शेतीची वारसनोंद कशी करावी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा तलाठी – 7/12 वारस नोंद प्रक्रिया महाराष्ट्र

 (शेतीची वारसनोंद कशी करावी याची संपूर्ण माहिती – कागदपत्रे, प्रक्रिया व नियम)

                  जमीनधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या जमिनीवर कायदेशीर वारसांची नोंद करणे आवश्यक असते. या प्रक्रियेला वारस नोंद असे म्हणतात. वारस नोंद झाल्याशिवाय 7/12 उताऱ्यावर वारसांची नावे चढत नाहीत आणि पुढील व्यवहार करता येत नाहीत.

या लेखात आपण वारस नोंद कशी करावी, कोणते कागदपत्र लागतात, अर्ज कुठे करायचा आणि किती वेळ लागतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

🔹 वारस नोंद म्हणजे काय?

जमीन धारकाच्या  मृत्यूनंतर त्याचे कायदेशीर वारस (पत्नी, मुले,नात ,नातू इ.) यांच्या नावाने जमिनीची नोंद 7/12, 8अ मध्ये करणे म्हणजे वारस नोंद होय.

🔹 वारस नोंद कधी करावी?

जमीन मालकाचा मृत्यू झाल्यावर,

7/12 उताऱ्यावर खूप काळापासून  मृत व्यक्तीचे नाव असताना

🔹 वारस नोंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज ,

स्थानिक चौकशी अहवाल,

जबाब,

मृत्यू दाखला / मृत्यू  प्रमाणपत्र (Death Certificate),

वारसाबाबतचे प्रतिज्ञापत्र,  

7/12 उतारा व 8अ उतारा,

सर्व वारसांचे आधार कार्ड.

(जर मयत व्यक्ती अविवाहित किंवा निपुर्त्रिक मयत झाल्यास आवश्यकतेनुसार सक्षम न्यायालयाकडून वारस प्रमाणपत्र लागू शकते)

अर्ज [ग्राम  महसूल अधिकारी (तलाठी) कार्यालयासाठी]

🔹 वारस नोंद कशी करावी? (स्टेप बाय स्टेप प्रक्रिया)

✅ 1️⃣ ग्राम  महसूल अधिकारी (तलाठी) कार्यालयात अर्ज करा

जमीन ज्या गावात आहे त्या गावच्या ग्राम  महसूल अधिकारी (तलाठी)कार्यालयात वारस नोंदीसाठी अर्ज करावा.

✅ 2️⃣ कागदपत्रांची तपासणी

ग्राम  महसूल अधिकारी (तलाठी) सर्व कागदपत्रे तपासतो व वारस ठराव  तयार करतो.सदर ठराव मंडळ अधिकारी यांना ONLINE पद्धतीने सादर केला जातो.मंडल अधिकारी यांनी ठराव मंजूर केल्यावरच ग्राम  महसूल अधिकारी (तलाठी) त्याचा फेरफार तयार करतात.

✅ 3️⃣ फेरफार नोंद (Mutation Entry)

ग्राम  महसूल अधिकारी (तलाठी) फेरफार नोंद करतो .त्याला विशिष्ट फेरफार नं पडतो व त्याची नोटीस ONLINE  चावडीवर प्रसिद्ध केली जाते.

✅ 4️⃣ हरकत कालावधी

साधारण 15 दिवस हरकतीसाठी दिले जातात.

✅ 5️⃣ मंजुरी

हरकत नसल्यास मंडळ अधिकारी / सक्षम अधिकारी फेरफार मंजूर करतो.

✅ 6️⃣ 7/12 वर नाव चढते

मंजुरीनंतर वारसांची नावे 7/12 व 8अ उताऱ्यावर दिसू लागतात.

🔹 वारस नोंद करण्यासाठी किती वेळ लागतो?

साधारणतः

⏳ 20 ते 25  दिवस

(कागदपत्रे पूर्ण असल्यास व हरकत नसल्यास)

🔹 वारस नोंद करताना महत्वाच्या सूचना

सर्व वारसांची नावे अचूक द्या

वाद असल्यास वारस नोंद थांबू शकते

गरज असल्यास न्यायालयाचा आदेश आवश्यक असतो(वर्ग २ वारस प्रकरणी)

🔹 वारस नोंद ऑनलाईन करता येते का?

सध्या महाराष्ट्रात वारसनोंद अर्ज प्रक्रिया ऑनलाईन  देखील उपलब्ध  आहे.

महाराष्ट्र शासनाची इ हक्क प्रणालीतून वारस नोंद सह इतर १० प्रकारच्या ७/१२ वरील नोंदी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

लिंक👉https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin

वरील लिंक वर क्लिक करून आधी नोंदणी करून घ्यावी.त्या नंतर ७/१२ MUTATION वर क्लिक करावे 

व टप्प्या टप्प्याने प्रक्रिया पूर्ण करावी .वर नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ठेवावे.(मर्यादा १००० KB).

🔹 वारस नोंद न केल्यास काय अडचणी येतात?

जमीन विक्री करता येत नाही

कर्ज मिळत नाही

सरकारी योजना लाभ मिळत नाही

कायदेशीर वाद निर्माण होतात

👉 अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कार्यालयास भेट द्या.


🔴अस्वीकरण (Disclaimer) :

या ब्लॉगवर प्रकाशित केलेली माहिती ही महाराष्ट्र शासनाच्या

शासन निर्णय (GR) व सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित आहे.

सदर माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे.

कोणतीही अधिकृत कार्यवाही करण्यापूर्वी संबंधित विभागाचा

अधिकृत शासन निर्णय (GR) किंवा संकेतस्थळ तपासावे.

या माहितीच्या आधारे झालेल्या कोणत्याही नुकसानास

हा ब्लॉग किंवा लेखक जबाबदार राहणार नाही.


📢 अशाच महत्वपूर्ण माहिती साठी

आमचे Facebook Page Follow करा

👍 Follow on Facebook

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

7/12 उतारा म्हणजे काय? 7/12 उतारा कसा वाचावा?

गाव नमुना 8-अ म्हणजे काय? | 8-अ उताऱ्याची सविस्तर माहिती

संजय गांधी निराधार अनुदान योजना – पात्रता काय?, लाभार्थी कोण? अनुदान किती?, अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती