संजय गांधी निराधार अनुदान योजना – पात्रता काय?, लाभार्थी कोण? अनुदान किती?, अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती

संजय गांधी निराधार अनुदान योजना – सामाजिक न्याय विभाग

(संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाच्या
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची महत्वाची योजना)

 संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली संजय गांधी निराधार अनुदान योजना ही समाजातील गरजू, निराधार, अपंग, विधवा, वृद्ध व आजारी व्यक्तींना मासिक आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जाते.

या योजनेचा उद्देश निराधार कुटुंबांना किमान आर्थिक आधार देणे हा आहे.

🟥पात्र कोण? 👇

संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत

 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, 

अनाथ मुले, 

अपंगातील सर्व प्रवर्ग ( किमान40% अपंगत्व ),

 क्षयरोग,पक्षघात, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग ,प्रमस्तीष्कघात, यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, 

निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), 

घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला, 

अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, 

देवदासी,

35 वर्षावरील अविवाहीत स्त्री,

 सिकलसेलग्रस्त महिला इ.

 या सर्वांना लाभ मिळतो.

🟥उत्पन्नाची अट:

दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.दिव्यांगसाठी रुपये 40,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक  उत्पन्न मर्यादा आहे.

(सध्या साधारणतः ₹21,000 / ₹40,000 – स्थानिक नियमांनुसार बदल होऊ शकतो)

👉 उत्पन्न दाखला आवश्यक आहे.

🟥किती आर्थिक मदत मिळते?👇

या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 1500/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असले तरी देखील प्रति लाभार्थी रुपये 1500/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.
(परंतु नुकतेच शासनाने या योजनेतील पात्र फक्त दिव्यांग लाभार्थी यांना सदर मदत रक्कम रु 1500/- वरून रक्कम रु. 2500/- इतकी वाढ केलेली आहे)

🟥आवश्यक कागदपत्रे👇

अर्जदाराचा आधार कार्ड
उत्पन्न दाखला/दारिदय रेषेखालील दाखला
रहिवासी दाखला
अपंगत्व प्रमाणपत्र (असल्यास) व UDID कार्ड प्रत.
विधवा / घटस्फोट प्रमाणपत्र (लागू असल्यास)
बँक पासबुक (नवीन)
पासपोर्ट साइज फोटो व इतर आवश्यक असल्यास कागदपत्रे 

🟥अर्ज करण्याची पध्दत👇
अर्जदार ‍हे संबंधित तहसिल कार्यालय /ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतात.
 अर्जाचा नमुना व त्यासोबत जेाडवयाची आवश्यक कागदपत्रे लिंक🔗👇

🟥संबंधित शासन निर्णय👇


🟥 अधिक माहिती साठी भेट दया👇


🟥संपर्क कार्यालयाचे नाव
जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसिल कार्यालय /ग्राम महसूल अधिकारी(तलाठी) कार्यालय


🔴अस्वीकरण (Disclaimer) :
या ब्लॉगवर प्रकाशित केलेली माहिती ही महाराष्ट्र शासनाच्या
शासन निर्णय (GR) व सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित आहे.
सदर माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे.
कोणतीही अधिकृत कार्यवाही करण्यापूर्वी संबंधित विभागाचा
अधिकृत शासन निर्णय (GR) किंवा संकेतस्थळ तपासावे.
या माहितीच्या आधारे झालेल्या कोणत्याही नुकसानास
हा ब्लॉग किंवा लेखक जबाबदार राहणार नाही.
 








📢 अशाच महत्वपूर्ण माहिती साठी

आमचे Facebook Page Follow करा

👍 Follow on Facebook

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

7/12 वर वारस नोंद कशी करावी? | वारस नोंद प्रक्रिया-सविस्तर माहिती

7/12 उतारा म्हणजे काय? 7/12 उतारा कसा वाचावा?

अकृषिक परवानगी व अकृषिक कर रद्द : नवीन GR (10 फेब्रुवारी 2026) महत्त्वाचे बदल (NA Tax cancled)