फेरफार उतारा म्हणजे काय? | फेरफार नोंदीची सविस्तर माहिती

🔷 फेरफार उतारा म्हणजे काय?

गाव नमुना 6 ड म्हणजेच फेरफार उतारा. जमिनीच्या मालकीत, हक्कात किंवा नोंदीत झालेल्या बदलांची अधिकृत महसूल नोंद.

हा अभिलेख ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)यांच्याकडील दफ्तराचा भाग आहे.

फेरफार उतारा नमुना महाराष्ट्र


सोप्या भाषेत सांगायचे झाले तर 👇

👉 जमिनीच्या हक्कात तसेच 7/12 वर झालेला बदल दाखवणारा उतारा म्हणजे फेरफार उतारा.


🔷 फेरफार नोंद कधी केली जाते?

खालील प्रसंगी फेरफार नोंद केली जाते 👇

जमीन खरेदी / विक्री

मृत्यूनंतर वारसा नोंद,

बक्षीसपत्र,

वाटपपत्र,

कोर्ट आदेशाने हक्क बदल,

7/12 दुरुस्ती,

सक्षम अधिकारी यांचे आदेशाने बदल,

बँक बोजा चढवणे/कमी करणे इत्यादी 


🔷 फेरफार उताऱ्यात कोणती माहिती असते?

फेरफार उताऱ्यात साधारणपणे ही माहिती असते 👇

फेरफार क्रमांक

फेरफार दिनांक

जुने खातेदार नाव

नवीन खातेदार नाव

बदलाचे कारण

संबंधित दस्तऐवज (नोंदणी क्रमांक)

ग्राम महसूल अधिकारी/मंडळ अधिकारी नोंद


🔷 फेरफार प्रक्रिया कशी होते?

1️⃣ अर्ज

संबंधित दस्तऐवजांसह ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)कार्यालयात अर्ज

2️⃣ नोंद 

ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) फेरफार नोंद घेऊन नोटीस बजवतात.

3️⃣ हरकत कालावधी

साधारण 15 दिवसांचा हरकत कालावधी

4️⃣ मंजुरी

हरकत नसल्यास सक्षम अधिकारी/मंडल अधिकारी मंजुरी देतात.

5️⃣ 7/12 अद्ययावत

मंजूर फेरफार 7/12 उताऱ्यावर चढवला जातो


🔷 फेरफार उतारा ऑनलाइन कसा पाहायचा?

 https://bhulekh.maharashtra.gov.in

2️⃣ जिल्हा → तालुका → गाव निवडा

3️⃣ फेरफार क्र. टाका 


या शिवाय फेरफार उतारा प्रमाणित प्रत आपल्याला आपल्या गावाचे ग्राम महसूल अधिकारी(तलाठी)यांचे कार्यालयात देखील मिळेल.


🔴फेरफार उतारा हा जमिनीच्या हक्कातील बदल समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जमीन व्यवहार, कर्ज प्रकरणे व कायदेशीर बाबींमध्ये फेरफार नोंदीला विशेष महत्त्व आहे


🔴महत्वाची सूचना:

साधारण 2015 पूर्वी म्हणजेच 7/12 संगणकीकरण होण्यापूर्वी फेरफार नोंद ही हस्तलिखित पद्धतीने होते असे. त्यामुळे त्या पूर्वीचे फेरफार उतारे हे आपणास सध्या तरी ऑनलाईन उपलब्ध नाहीत. ते आपण आपल्या तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातून प्राप्त करून घेऊ शकता.

सातबारा उताऱ्याबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा: 👇

https://www.mahsulmitra.in/2026/01/712-712.html


8 अ उताऱ्याबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा: 👇

https://www.mahsulmitra.in/2026/01/8-8.html


🟥Disclaimer: वरील माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. अधिकृत प्रक्रियेसाठी संबंधित महसूल कार्यालय किंवा शासकीय संकेतस्थळाचा संदर्भ घ्यावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

7/12 उतारा म्हणजे काय? 7/12 उतारा कसा वाचावा?

गाव नमुना 8-अ म्हणजे काय? | 8-अ उताऱ्याची सविस्तर माहिती