फार्मर ID (Agristack Farmer ID) कसा काढावा – सोप्या शब्दांत माहिती

 

Agristack अंतर्गत Farmer ID कसा काढावा – महाराष्ट्रातील शेतकरी फार्मर आयडी कार्ड दाखवत आहेत
(ही प्रतिमा Agristack Farmer ID योजनेचे प्रतीक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी Farmer ID कार्ड दाखवत असून या ID द्वारे शासकीय कृषी योजना, अनुदान, पीक विमा व PM-Kisan योजनेचा लाभ घेता येतो.)

🧑‍🌾 Farmer ID (Agristack) कसा काढावा? संपूर्ण माहिती

भारत सरकारच्या Agristack योजनेअंतर्गत Farmer ID (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहे. हा शेतकऱ्यांचा डिजिटल ओळख क्रमांक असून भविष्यात सर्व शासकीय कृषी योजना याच ID शी जोडल्या जाणार आहेत.

Farmer ID म्हणजे काय?

Farmer ID हा प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाणारा युनिक (Unique) ओळख क्रमांक आहे.

या ID मध्ये:

शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती

जमीन नोंदी (7/12, 8A)

आधार व मोबाईल लिंक

अशी माहिती सुरक्षित ठेवली जाते.

📝 Farmer ID कसा काढावा? (Step by Step)

🔹 CSC / आपले सरकार सेवा केंद्रातून

हा सर्वात सोपा आणि सध्या वापरात असलेला मार्ग आहे.

प्रक्रिया:

जवळच्या CSC / आपले सरकार सेवा केंद्रात भेट द्या

आवश्यक कागदपत्रे द्या

ऑपरेटर Agristack पोर्टलवर नोंदणी करतो

आधार OTP द्वारे पडताळणी होते

🔴ज्यांचे आधार वरील नाव व 7/12 उतारा वरील नावात काही बदल नसतो त्यांचे ID ऑटोमॅटिक मान्यता दिले जाते.

परंतु नावात बदल असेल तर,

 Leval 1 ग्राम महसूल अधिकारी यांच्या मान्यतेला जाते. 

Leval 2 यात ग्राम महसूल अधिकारी यांनी मान्यता दिल्यावर तहसीलदार यांच्या मान्यतेला जाते.

दोन्ही level ची मान्यता मिळाली की फार्मर ID तयार होतो.


📄 आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

7/12 उतारा किंवा 8A उतारा

आधार लिंक मोबाईल नंबर


🎯 Farmer ID चे फायदे 

PM-Kisan योजनेचा लाभ

पीक विमा योजना

शेतकरी अनुदान योजना

कृषी कर्ज प्रक्रिया सोपी

भविष्यातील सर्व कृषी योजना एका ID वर

⚠️ महत्वाच्या सूचना

एका शेतकऱ्यास एकच Farmer ID मिळतो

आधार व जमीन नोंदी अचूक असाव्यात

चुकीची माहिती दिल्यास Farmer ID अडचणीत येऊ शकतो

Farmer ID हा भविष्यात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने वेळेत Farmer ID काढून ठेवणे आवश्यक आहे.

⚠️ Disclaimer (डिस्क्लेमर)

ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी दिली आहे. Farmer ID संदर्भातील नियम व प्रक्रिया वेळोवेळी शासनाकडून बदलू शकतात. अचूक माहितीसाठी अधिकृत CSC केंद्र किंवा संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा.


📢 अशाच महत्वपूर्ण माहिती साठी

आमचे Facebook Page Follow करा

👍 Follow on Facebook

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

7/12 उतारा म्हणजे काय? 7/12 उतारा कसा वाचावा?

गाव नमुना 8-अ म्हणजे काय? | 8-अ उताऱ्याची सविस्तर माहिती

संजय गांधी निराधार अनुदान योजना – पात्रता काय?, लाभार्थी कोण? अनुदान किती?, अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती