महाराष्ट्रातील महसूल विभागातील पदांची माहिती
🔴तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदार – कामकाज, पात्रता व वेतन🔴
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये जमीन नोंदी, महसूल वसुली, फेरफार नोंदी, वारस नोंदी, पीक पाहणी यासारखी महत्त्वाची कामे केली जातात.
गाव पातळीपासून तालुका पातळीपर्यंत या विभागात विविध अधिकारी काम करत असतात.
या लेखात आपण तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदार या महत्त्वाच्या पदांची माहिती पाहू.
तलाठी हा महसूल विभागातील गाव पातळीवरील सर्वात महत्त्वाचा कर्मचारी आहे. प्रत्येक गावासाठी तलाठी नेमलेला असतो.
तलाठीची प्रमुख कामे
-7/12 आणि 8A उताऱ्यांच्या नोंदी ठेवणे
-फेरफार नोंदी करणे
-वारस नोंद करणे
-महसूल वसुली करणे
-पीक पाहणी करणे
-जमीन खरेदी-विक्री नोंदी तपासणे
पात्रता
-कोणत्याही शाखेतील पदवी
-तलाठी भरती परीक्षा उत्तीर्ण
वेतन (7th Pay Commission)
S-8 Pay Level
₹25,500 ते ₹81,100
2. मंडल अधिकारी (Circle Officer)
मंडल अधिकारी हा तलाठ्यांचा वरिष्ठ अधिकारी असतो. एका मंडल अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली साधारण 4 ते 6 तलाठी काम करतात.
मंडल अधिकाऱ्याची कामे
-तलाठ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे
-महसूल नोंदींची तपासणी करणे
-फेरफार नोंदींची पडताळणी
-महसूल वसुलीचे निरीक्षण
-जमिनीच्या वादांमध्ये प्राथमिक चौकशी.
पदोन्नती
बहुतेक वेळा तलाठी पदावरून पदोन्नती मिळून मंडल अधिकारी बनता येते.मंडल अधिकारी पदी थेट निवड होत नाही. हे पद फक्त पदोन्नती ने भरले जाते.
वेतन (7th Pay Commission)
S-10 Pay Level
₹29,200 ते ₹92,300
3. तहसीलदार
तहसीलदार हा तालुका पातळीवरील महसूल विभागाचा प्रमुख अधिकारी असतो. संपूर्ण तालुक्यातील महसूल प्रशासनाची जबाबदारी तहसीलदारावर असते.
तहसीलदाराची प्रमुख कामे:-
-तालुक्यातील महसूल प्रशासनाचे नियंत्रण
-जमीन संबंधित वादांचे निर्णय
-महसूल वसुलीचे नियोजन
-नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे व मदत कार्य
-शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी
तहसीलदार कसे बनता येते?
MPSC राज्यसेवा परीक्षा पास करून किंवा नायब तहसीलदार पदावरून पदोन्नती.
वेतन (7th Pay Commission)
S-20 Pay Level
₹56,100 ते ₹1,77,500
महसूल विभागातील पदांची साखळी
महसूल विभागातील पदांची रचना पुढीलप्रमाणे आहे:
तलाठी
⬇
मंडल अधिकारी
⬇
नायब तहसीलदार
⬇
तहसीलदार
⬇
उपविभागीय अधिकारी (SDO)
महसूल विभागात तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदार ही पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. गावातील जमीन नोंदीपासून तालुक्याच्या प्रशासनापर्यंत सर्व कामे या अधिकाऱ्यांमार्फत केली जातात.
🔴अस्वीकरण (Disclaimer) :
या ब्लॉगवर प्रकाशित केलेली माहिती ही महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय (GR) व सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित आहे.
सदर माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. कोणतीही अधिकृत कार्यवाही करण्यापूर्वी संबंधित विभागाचा अधिकृत शासन निर्णय (GR) किंवा संकेतस्थळ तपासावे.
या माहितीच्या आधारे झालेल्या कोणत्याही नुकसानास हा ब्लॉग किंवा लेखक जबाबदार राहणार नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा