फेरफार उतारा म्हणजे काय? | फेरफार नोंदीची सविस्तर माहिती
🔷 फेरफार उतारा म्हणजे काय? गाव नमुना 6 ड म्हणजेच फेरफार उतारा. जमिनीच्या मालकीत, हक्कात किंवा नोंदीत झालेल्या बदलांची अधिकृत महसूल नोंद. हा अभिलेख ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)यांच्याकडील दफ्तराचा भाग आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर 👇 👉 जमिनीच्या हक्कात तसेच 7/12 वर झालेला बदल दाखवणारा उतारा म्हणजे फेरफार उतारा. 🔷 फेरफार नोंद कधी केली जाते? खालील प्रसंगी फेरफार नोंद केली जाते 👇 जमीन खरेदी / विक्री मृत्यूनंतर वारसा नोंद, बक्षीसपत्र, वाटपपत्र, कोर्ट आदेशाने हक्क बदल, 7/12 दुरुस्ती, सक्षम अधिकारी यांचे आदेशाने बदल, बँक बोजा चढवणे/कमी करणे इत्यादी 🔷 फेरफार उताऱ्यात कोणती माहिती असते? फेरफार उताऱ्यात साधारणपणे ही माहिती असते 👇 फेरफार क्रमांक फेरफार दिनांक जुने खातेदार नाव नवीन खातेदार नाव बदलाचे कारण संबंधित दस्तऐवज (नोंदणी क्रमांक) ग्राम महसूल अधिकारी/मंडळ अधिकारी नोंद 🔷 फेरफार प्रक्रिया कशी होते? 1️⃣ अर्ज संबंधित दस्तऐवजांसह ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)कार्यालयात अर्ज 2️⃣ नोंद ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) फेरफार नोंद घेऊन नोटीस बजवतात. 3️⃣ हरकत कालावधी साधारण 15 दिवसांच...